विनय मोहन क्वात्रा बनले अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत !

परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

विनय मोहन क्वात्रा बनले अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत !

भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त मुत्सद्दी आणि माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मोहन क्वात्रा यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. आता ते लवकरच या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताची भूमिका ठामपणे मांडली आहे.

१९८८ बॅचचे आयएफएस अधिकारी तरनजीत सिंह संधू यांची जागा आता विनय मोहन क्वात्रा घेणार आहेत. भारताचे पुढील राजदूत म्हणून परराष्ट्र मंत्रालयानाने विनय मोहन क्वात्रा यांच्या नावाची घोषणा केली आहे. विनय मोहन क्वात्रा हे १९८८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. विनय मोहन क्वात्रा यांनी हर्षवर्धन श्रृंगला यांच्यानंतर ३४ वे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला आणि १ मे २०२२ ते १४ जुलै २०२४ पर्यंत सेवा बजावली.

हे ही वाचा:

यूपीएससीने पूजा खेडकरला विचारले, आयएएसची निवड का रद्द करू नये?

पश्चिम त्रिपुरामध्ये १९७१ च्या भारत-पाक युद्धातील २७ मोर्टारचे गोळे सापडले !

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड आणि जग थांबलं…

पाकिस्तानींचा मोठ्या प्रमाणावर रहिवास असलेल्या लीड्समध्ये हिंसाचार उसळला !

परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी क्वात्रा नेपाळमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम पाहत होते. भारताच्या शेजारी तसेच युनायटेड स्टेट्स, चीन आणि युरोपमध्ये काम करण्याच्या त्यांच्या व्यापक कौशल्यासाठी ते ओळखले जातात. ३५ वर्षांपेक्षा जास्त राजकीय कारकिर्दीचा अनुभव असलेल्या क्वात्रा यांनी ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. त्यांनी मे २०१० ते जुलै २०१३ दरम्यान वॉशिंग्टन डीसी येथील दूतावासात मंत्री (वाणिज्य) म्हणूनही काम केले आहे.

Exit mobile version