27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषविनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे निकाल जाहीर!

विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे निकाल जाहीर!

गुरू नानक खालसा महाविद्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध दिग्दर्शक,अभिनेते आणि निर्माते विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे’ लघुपट स्पर्धेचे (शॉर्ट फिल्म) आयोजन करण्यात आले होते.यासाठी १८ ते २५ वर्ष आणि २५ वर्षांवरील अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. गुरू नानक खालसा महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.या सोहळ्यात सर्वश्री भरत दाभोळकर, सुकन्या कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री , चिन्मयी सुमित , उपेंद्र लिमये, प्रतिमा कुलकर्णी , संजय मोने , लोकेश गुप्ते , महेश लिमये , विजय पाध्ये आदि रंगकर्मी उपस्थित होते.

विनय आपटे आयुष्यभर शिक्षकाच्या भूमिकेत होते, त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आणि अनेकजण आज अभिनय आणि दिग्दर्शकाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. अगदी महेश मांजरेकरसह, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, पासून ते संकर्षण कर्‍हाडे पर्यंत.या अभिनेत्यांनी आपल्या क्षेत्रात एक उच्चांक गाठला आहे.’विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे’ चालू असलेल्या कार्याला खंड न पडल्याचे प्रतिष्ठान च्या विश्वस्त वैजयंती आपटे यांनी सांगितले.

खालसा महाविद्यालयाचे प्रमुख किरण माणगावकर यांनी सुद्धा विनय आपटे यांच्या आठवणी जागवल्या. उपस्थितांचे स्वागत करताना ते म्हणाले की, खालसा महाविद्यालयात आता अनेक मराठी स्पर्धक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत.तसेच यंदाच्या आय एन टी आणि ईप्टाआंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी

सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद

शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!

पाकच्या बॉर्डरवर तेजस विमाने चुटकीसरशी पोहोचणार!

प्लानेट मराठी चे संचालक पुष्कर श्रोत्री यांनी यावेळी बोलताना या लघुपट स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार मानले आणि हे सगळे लघुपट प्लानेट मराठी या ओ टी टी प्लॅटफॉर्म वरुन दाखवले जातील अशी घोषणा देखील त्यांनी केली.

 

भरत दाभोळकर , उपेंद्र लिमये, राजन वाघधरे अशा अनेक रंगाकर्मिनी विनय आपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.या शॉर्ट फिल्म स्पर्धेत वेग,वृद्धाश्रम,डेटिंग ॲप,आणि कुत्रिम बुद्धिमत्ता(एआय) असे विषय होते.या लघुपट स्पर्धेसाठी एकूण ३६ प्रवेशिका आल्या होत्या.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिमा कुलकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे , राजन वाघदरे , रोहिणी निनावे, भक्ति मायाळू आणि भरत दाभोळकर यांनी काम पाहिले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हणून स्मिता गवाणकर यांनी काम पाहिले.

१८ वर्षे ते २५ वर्षे वयोगट
प्रथम क्रमांक – लघुपट -स्लोडाउन – भावेश परब रु १५ हजार आणि मानचिन्ह,
द्वितीय क्रमांक – आरएस. १० हजार आणि मानचिन्ह लघुपट – वेग – प्रथमेश नाईक
तृतीय क्रमांक – लघुपट -आय अॅम कियान –ध्रुव कौशल ,रु ७,५००/- आणि मान चिन्ह

वयोगट २५ वर्षे वरील खुला गट
प्रथम क्रमांक – रु १५ हजार आणि मानचिन्ह,लघुपट – टर्टल – सूचित पाटील
द्वितीय क्रमांक एऊ १०,000 आणि मान चिन्ह ,लघुपट – जरा विसावू ह्या वळणावर – हर्षदा उदगीरकर
तृतीय क्रमांक – रु ७,५०० आणि संस्कृती चिन्ह,लघुपट – नीती – सुमित चौधरी

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा