कर्नाटकमधील गावकऱ्यांचा वीजबिल भरण्यास नकार

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीआधी सत्तेत आल्यास सर्वांना २०० मीटरपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा केली होती.

कर्नाटकमधील गावकऱ्यांचा वीजबिल भरण्यास नकार

वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी आणि थकीत बिल वसूल करण्यासाठी आलेल्या वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकमधील काही गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याची घटना घडली. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीआधी प्रचार करताना सत्तेत आल्यास सर्वांना २०० मीटरपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. शिवकुमार यांनीही १ जूनपासून वीजबिल भरू नका, असे आवाहन निवडणुकीआधी केले होते.

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे आता काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण होणार, असा विश्वास गावकऱ्यांना आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक असलेल्या २०० मीटरपर्यंतच्या मोफत विजेचे आश्वासनही पूर्ण होईल, यावर गावकऱ्यांना विश्वास आहे. त्यामुळेच अनेक गावांमध्ये वीजबिल वसूल करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे.

चित्रदुर्गा जिल्ह्यातील जालिकट्टी गावात मीटर रींडिंग घेण्यासाठी आणि वीजबिल वसूल करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले. ‘आम्ही दर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत मीटर रीडिंग घेण्यासाठी आणि बिल देण्यासाठी प्रत्येक घरांना भेटी देतो. मात्र जालिकट्टी गावात गावकऱ्यांनी आम्हाला घरातही येऊ दिले नाही आणि वीजबिल भरण्यासही नकार दिला,’ असे एका इंजिनीअरने सांगितले. सरकार अधिकृतरीत्या स्थापन झाल्यानंतरच हे होऊ शकेल, असे पटवून दिल्यानंतरही गावकरी ते ऐकण्यास तयार नाहीत.

हे ही वाचा:

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

‘द केरला स्टोरी’मध्ये द्वेषयुक्त भाषण; प. बंगाल सरकारचा दावा

राज्यात सध्या १.९ कोटी घरे असून जर त्यांना प्रति महिना २०० युनिट वीज मोफत देण्याचे ठरवल्यास प्रति युनिट ८.७५ रुपये खर्च धरल्यास महिन्याला हा खर्च तीन हजार ३६७ कोटी रुपयांवर तर वर्षाला ४४ हजार ४०४ कोटींवर पोहोचू शकतो. जर निम्म्या घरांना मोफत वीज देऊ केली तर, वर्षाला २० हजार कोटींची गरज लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version