गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपण आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. तर मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही असे गोखले यांनी सांगितले. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत गोखले यांनी आपले मत मांडले.
पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच ‘मला हा विवाद माझ्या बाजूने कायमचा संपवायचा आहे. ज्या विवादित मुद्द्यांवरून गदारोळ सुरु आहे यावर मी आज बोलणार आहे’ असे गोखले यांनी स्पष्ट केले. तर पुण्यातील आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ यांनी माझा ७६ वा वाढदिवस साजरा करताना जो माझा सत्कार केला त्यावेळी मी केलेले भाषण माध्यमांनी दाखवलेच नाही. असे गोखले यांनी म्हटले आहे.
अभिनेत्री कंगना रानौत हिने जी विधाने केली त्याला तिची काही करणे असू शकतात. त्याला मी जे समर्थन केले त्याला माझी काही करणे असू शकतात. आम्ही एकत्र काम केले नाही. आमची ओळख नाही. पण कोणी काही बोलत असेल तर त्यावर आपले मत व्यक्त करण्याचा माझा अधिकार आहे. तिला मी पाठिंबा दिला त्याला माझी अशी काही कारणे आहेत. कंगनाचा अभ्यास मला माहित नाही. पण माझा राजकीय अभ्यास मी जाणतो.” असे विक्रम गोखले म्हणाले.
हे ही वाचा:
भारताने दिल्या १०० देशांना लशी!
भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन
‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
यावेळी त्यांनी २०१४ साली गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीचाही संदर्भ त्यांनी दिला. “इंग्लंड मध्ये गार्डियन नावाचे जे वृत्तपत्र निघते त्याची १८ मी २०१४ रोजी निघालेली आवृत्ती वाचावी. कंगना तेच बोलली आणि मी देखील त्याचेच समर्थन केले. २०१४ साली भारतीय माणसाला खरे स्वातंत्र्य मिळाले यावर मी ठाम आहे आणि ते माझे मत मी बदलणार नाही. मी माझ्या मूळ भाषणात काय बोललो हे माध्यमांनी दाखवले नाही. ते दाखवले तर आता जे नवे स्वातंत्र्य सैनिक उदयास आले आहेत, जे अश्रू ढाळतायत त्यांना कळेल की मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही.”
मी भाषणात म्हणालो, ‘दे दि आझादी बिना खडगं बिना ढाल’ हे म्हणताना ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली, ब्रिटिशांच्या गोळ्या खाल्ल्या, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही का? असा सवाल गोखले यांनी केला. तर माझा भारत २०१४ साली जागतिक पटलावर एक मोठी राजकीय ताकद म्हणून उदयास आला असे प्रतिपादन विक्रम गोखले यांनी केले आहे.