…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आज माध्यमांवर भडकलेले पाहायला मिळाले. आपल्या विधानांचे माध्यमांनी सोयीने वार्तांकन केले असा आरोप गोखले यांनी केला आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विक्रम गोखले यांच्या ज्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला त्याबद्दल गोखले यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच ‘मला हा विवाद माझ्या बाजूने कायमचा संपवायचा आहे. ज्या विवादित मुद्द्यांवरून गदारोळ सुरु आहे यावर मी आज बोलणार आहे’ असे गोखले यांनी स्पष्ट केले. तर पुण्यातील आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ यांनी माझा ७६ वा वाढदिवस साजरा करताना जो माझा सत्कार केला त्यावेळी मी केलेले भाषण माध्यमांनी दाखवलेच नाही. असे गोखले यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

न्यूझीलंड सोबत आज दुसरा टी२० सामना! भारताला मालिका विजयाची संधी

बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

तर माध्यमांना कोणत्या प्रसंगी काय प्रश्न विचारावेत हे समजत नाही असे देखील गोखले म्हणाले. पत्रकार संताप आणणारे प्रश्न विचारतात असे मत गोखले यांनी मांडले. आपण ही पत्रकार परिषद रेकॉर्ड करत आहोत म्हणजे माझ्या वक्तव्यांचा विपर्यास किंवा मोडतोड केली जाणार नाही. तर माध्यमांनी ही पत्रकार परिषद दाखवली नाही तर आपण आपल्या जवळील रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकणार असल्याचे गोखले यांनी सांगितले.

Exit mobile version