२०१७मध्ये एका गर्भवती मुस्लिम महिलेला शिवीगाळ करणे, ठार मारणे आणि तिने हिंदू धर्मातील पुरुषाशी लग्न केल्यामुळे तिला पेटवून दिल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी दोन व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावली. हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या मुख्य आरोपींच्या अन्य पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, दोषी व्यक्तींना दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ४.२ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. इब्राहिमसाब महम्मदसाब अत्तार आणि अकबर महम्मदसाब अत्तार अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत.
अन्य पाच आरोपी जिल्ह्यातील मुड्डेबिहाल शहरातील गुंडाकनाल गावातील आहेत; त्यात महिलेची आई रमजानबी अत्तार आणि तिचे नातेवाईक, दावलबी उर्फ सलमा बंदेनवाज जमादार, अजमा जिलानी दखानी, अब्दुलखदर दखानी आणि दावलबी सुभान धन्नूर यांचा समावेश आहे.सन २०१७मध्ये एका तरुण मुस्लिम महिलेने हिंदू पुरुषाशी लग्न केल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी तिला जिवंत जाळले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यातील गुंडकनाला गावात ही घटना घडली.
हे ही वाचा:
झारखंड रोख रक्कम जप्तीचे प्रकरण; १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागावरून कोट्यवधींची वसुली
ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स
“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!
बानू बेगम नावाची २१ वर्षीय मुस्लिम महिला २४ वर्षीय सायबन्ना शरणप्पा कोन्नूर या वाल्मिकी जातीतील हिंदू मुलाच्या प्रेमात पडली होती. बानू आणि सायबन्ना दोघेही एकाच गावचे रहिवासी होते. जानेवारी २०१७मध्ये जेव्हा बानूच्या पालकांना त्यांच्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी सायबन्नावर क्रूर हल्ला केला होता.या घटनेनंतर बानू आणि सायबन्ना लग्नासाठी गोव्यात पळून गेले. नंतर त्यांनी कर्नाटकातील मुड्डेबिहाल येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात लग्नाची नोंदणी केली. जेव्हा बानू गरोदर राहिली तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांचे लग्न स्वीकारतील, असा विचार करून ते जोडपे गावी परतले. ३ जून २०१७ रोजी हे जोडपे गुंडाकनाला गावात परतले आणि बानूच्या गरोदरपणाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांच्यात मोठे भांडण झाले.
सायबन्नावर क्रूरपणे प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर वार करण्यात आले. बानूच्या आईने हिंदू व्यक्तीवर दगडफेक केली. मात्र, तो कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि मदतीसाठी त्याने तळीकोट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली, मदत मागितली आणि तिला वाचवण्यासाठी बानूच्या घरी परत धाव घेतली. मात्र तो बानूच्या घरी पोहोचेपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी तिला पेटवून दिले होते.