दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपथी याच्या चमूवर हल्ला झाला आहे. बंगलोर विमानतळावर ही घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात विजय सेतुपथी सुखरूप असून त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.
बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचे समजते. अभिनेता विजय सेतुपथी हा विमानाने प्रवास करून बंगलोर विमानतळावर दाखल झाला होता. या प्रवासात जॉनसन नावाचा एक सहप्रवासी होता. या जॉनसन नावाच्या सहप्रवाशा सोबत विजय सेतुपथीच्या स्वीय सहाय्यकाचा वाद झाला. या वादाचे नेमके कारण समोर आले नाही. पण दोघांमधील हा वाद चांगलाच चिघळला.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट
पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल
भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
विजय सेतुपथीच्या सहाय्यक असलेल्या या रागातूनच जॉनसनने बंगलोर विमानतळावर त्याच्यावर हल्ला चढवला. विजय सेतुपथीच्या चमूवर तो धावून गेला. यावेळी विजय सेतुपथीच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केले आणि त्याचा बचाव केला. तर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेने या जॉनसन नामक इसमाला ताब्यात घेतले आहे.
अभिनेता विजय सेतुपथी हा प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमाराच्या शोकसभेसाठी बंगलोर येथे आला होता. या शोकसभेत सेतुपथी याने पुनीत राजकुमाराला श्रद्धांजली अर्पण केली.