नवी मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख, माजी नगरसेवक विजय माने यांची कन्या अश्विनी हिचा विवाह भूषण म्हसे यांच्याशी १६ मे रोजी पार पडला. हा विवाह सोहळा माने यांच्या स्वतःच्या सातारा जिल्ह्यातील अनावळे या निसर्गसौंदर्य गावात पारंपरिक पद्धतीने झाला. भूषण म्हसे हे विघ्नहर सहकारी पतसंस्थेचे संचालक विश्राम म्हसे यांचे चिरंजीव.
माजी नगरसेवक विजय माने एका सामान्य कुटुंबातील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली अतोनात मेहनत करून विजय माने यांनी नवी मुंबईत स्वतःचे राजकीय वलय निर्माण केली. त्यांनी समाजोपयोगी भरपूर कामे केली. विजय माने हे बाळासाहेबांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आहेत. बाळासाहेबांच्या या तत्वानुसार त्यांनी सामाजिक भान ठेवत या सोहळ्यानिमित्त काही सामाजिक कार्यातून चांगला आदर्श लोकांसमोर ठेवला.ट
हेही वाचा :
मोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले…
‘त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही’
‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?
राजकारणापलीकडे जपलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे या लग्न सोहळ्याला सर्व राजकीय पक्षांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, काँग्रेस जिल्हाप्रमुख अनिल कौशिक, शिवसह्याद्री पतपेढी अध्यक्ष भाई वांगडे, मराठा महासंघ नेते दादा जगताप, पुणे उद्योजक राम जगदाळे, आमदार सदाभाऊ संपकाळ तसेच सर्व पक्षीय नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते.