आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या २४ वर्षीय विग्नेश पुथुरने आपल्या शानदार फिरकी गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केरळच्या मल्लपुरम येथील या युवा खेळाडूने आपल्या अफलातून चायनामन स्पिनने सर्वांना प्रभावित केले. विग्नेश पुथुरचा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची प्रशंसा देखील मिळवली.
पदार्पणातच धमाका
आयपीएल २०२५ मधील पहिल्या सामन्यात विग्नेश पुथुरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच मोठा ठसा उमटवला. मुंबई इंडियन्सने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली होती आणि त्याने आपल्या फिरकीच्या जादूने संधीचे सोनं केलं.
त्याने आपल्या पहिल्याच षटकात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद केले. गायकवाडने फुल लेंथ चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट विल जॅक्सच्या हाती गेला आणि मुंबई इंडियन्सला बळी मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने शिवम दुबेला लाँग ऑन वर झेलबाद केले आणि पुढच्या षटकात दीपक हूड्डालाही स्लॉग स्वीप खेळताना डीप स्क्वेअर लेगवर झेलबाद केले.
गोलंदाजीतला प्रवास
केरळच्या या फिरकीपटूचा क्रिकेट प्रवास अतिशय रोचक राहिला आहे. विग्नेशने ११ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो मध्यमगती गोलंदाज होता. पण स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफच्या सल्ल्याने त्याने चायनामन फिरकी गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर केरळ क्रिकेट लीगमध्ये अलेप्पी रिपल्स संघासाठी खेळला आणि नंतर तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये काही काळ घालवला. मात्र, अजूनही त्याने केरळच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याचा अनुभव घेतलेला नाही. तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला आयपीएल लिलावात ₹३० लाख रुपयांना विकत घेतले.
संघ हरला, पण पुथुर चमकला
विग्नेश पुथुरसाठी पदार्पणाचा सामना संस्मरणीय ठरला. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला १५६ धावांचे लक्ष्य दिले, जे सीएसकेने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गाठले. मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला असला, तरीही पुथुरच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याने ३ षटकांमध्येच ३ बळी घेतले होते, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला चौथं षटक उरकायला दिलं नाही. हा निर्णय नंतर चुकीचा ठरला, कारण विग्नेशने संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
जिथे जिथे हिंदूंची संख्या कमी झाली तिथे त्यांना मारहाण झाली, हिंदूंनी संख्या वाढवावी!
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार
धोनीने केला कौतुकाचा वर्षाव
या शानदार कामगिरीनंतर महेंद्रसिंग धोनीने स्वतः येऊन विग्नेश पुथुरची पाठ थोपटली. हा क्षण पुथुरच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय ठरला. समालोचक रवी शास्त्री यांनी देखील टिप्पणी करताना सांगितले, “हा क्षण विग्नेश कधीच विसरणार नाही.”
मुंबई इंडियन्सच्या हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याच्या कामगिरीचे कौतुक करत म्हटले, “कमाल आहे, एमआय नेहमी असाच युवा खेळाडूंना संधी देतो. आमचे स्काउट्स वर्षभर मेहनत करतात आणि विग्नेश हीच त्याच्या मेहनतीचं फळ आहे.”
भविष्यात मोठी संधी?
विग्नेश पुथुरने पदार्पण सामन्यातच सर्वांना प्रभावित केले आहे. जर तो असाच दमदार खेळ करत राहिला, तर केवळ मुंबई इंडियन्सच नव्हे, तर भविष्यात भारतीय संघातही स्थान मिळवू शकतो.