मुंबई क्रिकेट क्लब (एमसीसी) आणि ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे(जेएसब्ल्यू) प्रशिक्षक विद्या पराडकर आणि विजय सक्सेना तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राजेंद्र कुमार बोवरी आणि विनोद खत्री यांना सन्मानित करण्यात आले.
चारही मान्यवरांना तेज प्रताप सिंग यांच्या स्मरणार्थ एमसीसी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३० वर्षांहून अधिक काळ मुंबई क्रिकेटशी निगडित असलेल्या प्रशिक्षक विद्या पराडकर यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि विद्यमान कसोटीपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक रणजी ट्रॉफी खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.
हे ही वाचा:
बहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड
आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
इस्रोचा ‘नाविक’ उपग्रह अवकाशात झेपावला
श्रीमंत गिर्यारोहक, व्यावसायिकीकरणामुळे एव्हरेस्ट मोहिमेत अधिक मृत्यू
मुंबई क्रिकेट क्लब आणि ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनने माझ्या कोचिंगमधील योगदानाची दखल घेतल्याबद्दलमला खूप आनंद झाला. मी जवळपास ३० वर्षांपासून मुंबईच्या क्रिकेट मैदानावर प्रशिक्षण देत आहे आणि हा पुरस्कार म्हणजे माझ्या मेहनतीला मिळालेल्या न्याय आहे. सत्कार केल्याबद्दल मी ज्वाला सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो, असे प्रशिक्षक विद्या पराडकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.
प्रशिक्षक विजय सक्सेना हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. एमसीसी आणि जेएसएचे संस्थापक आणि डायरेक्टर ज्वाला सिंग यांची कारकीर्द सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली आकाराला आली. सक्सेना यांनी गोरखपूर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधून अनेक युवा क्रिकेटपटू घडवले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सक्सेना हे गोरखपूरहून मुंबईत आले. राजेंद्र कुमार बोवरी हे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी वरिष्ठ क्रीडा प्रतिनिधी होते. विनोद खत्री हे नवभारत टाइम्सचे माजी वरिष्ठ क्रीडा वार्ताहर होते.