अभिनेत्री विद्या बालन चे बनावट खाते तयार करून फसवणूक!

खार पोलिसांकडून गुन्हा दाखल

अभिनेत्री विद्या बालन चे बनावट खाते तयार करून फसवणूक!

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचे बोगस इन्स्टाग्राम आणि जीमेल खाते तयार करून फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार खुद्द विद्या बालनने खार पोलीस ठाण्यात दिली आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालन ही पती सिद्धार्थ कपूरसोबत वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड येथील सिल्व्हर सॅण्ड अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर राहण्यास आहे. १६ फेब्रुवारी रोजी, तिला स्टाईलिश , फिल्म इंडस्ट्रीतील प्रणय याने संपर्क करून कळवले की, त्याला एका व्हॉट्सॲपवर क्रमांकावरून मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये ती विद्या बालन असल्याचा दावा करण्यात आला आहे,आणि चर्चेनंतर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने कामाच्या संधींचे आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा:

कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘आप’चे चंदिगडचे महापौरपद टिकेल काय?

मात्र विद्या बालनने प्रणयला कळवले की तीने असा कुणालाही मेसेज केलेला नाही, आणि ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे तो मोबाईल क्रमांक तीचा नाही असे तीने प्रणय याला कळवले.त्यावेळी बालनच्या लक्षात आले की कोणीतरी तीच्या नावाचा वापर करून कामाबाबत लोकांशी संपर्क साधत आहे. विद्या बालनच्या संपर्कात असलेल्या लोकांनी तीला कळवले की, तिच्या नावाचे इन्स्टाग्राम अकाउंट vidya.balan.pvt असे खाते व जीमेल अकाउंट vidyabalanspeaks@gmail.com असे खाते तयार केलेले असुन त्यावरून ते फिल्म इंडस्ट्रीमधील व अन्य लोकांना संपर्क साधुन विद्या बालन असल्याचे भासवुन काम देण्याचे बाबत चर्चा करायची असल्याचे सांगुन फसवणुक करीत आहे.

दरम्यान, विद्या बालन ची मॅनेजर अदिती संधू हिने २०जानेवारी रोजी खार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून खार पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी विद्या बालनचा जबाब नोंदवून अनोळखी व्यक्ती विरुद्ध फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version