गुजरातमधील सुरत येथील हिरे बनवणाऱ्या कंपनीच्या कारागिरांनी आठ कॅरेटच्या हिऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार केली आहे. पंतप्रधान मोदींच्या साकारण्यात आलेल्या प्रतिमेचा हा हिरा शहरातील एका प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. ‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या इको-फ्रेंडली पीसने स्थानिक प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले.
एसके कंपनीने हा हिरा तयार केला आहे. याबाबत माहिती देताना कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले की, हा हिरा सुरुवातीला ४० कॅरेटचा लेब्रॉन हिरा होता. तथापि, आकारासाठी कापून पॉलिश केल्यानंतर त्याचा आकार आठ-कॅरेट करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींची प्रतिमा असलेला हा हिरा जवळपास २० कारागिरांनी तयार केला असून यासाठी एका महिन्याचा कालावधी लागल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
अनंत अंबानीने दिली गिफ्ट केले २ कोटीची घड्याळे !
जम्मू काश्मीरमध्ये हिंदू यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला
लाल दिवा लावलेली पूजा खेडकरची गाडी जप्त !
२० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडली गोळी !
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर हा हिरा तयार करण्यात आला असून तो पर्यावरणपूरक असल्याचेही व्यवस्थापकाने सांगितले. सुरत येथे भरलेल्या प्रदर्शनाला गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनीही भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेच्या हा दागिना प्रदर्शनात आकर्षणाचा भाग ठरला.