काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पटोले आपल्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. टीकेनंतर नाना पटोलेंनी सांगितले की, कार्यकर्ता पायावर पाणी घालत होता आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुवत होतो. परंतु, हे सर्व खोटे असून खोटेपणात काँग्रेसचा “हात” कोणीच धरू शकत नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केली आहे. यासोबत कार्यकर्त्याकडून पाय धुतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
नाना पटोले हे एका कार्यक्रामासाठी सोमवारी( १७ जून) अकोल्यातील वडेगाव येथे गेले होते. त्या दरम्यान संत श्री गजानन महाराजांची पालखी वडेगाव येथे मुक्कामी होती. तसेच वडेगाव काल पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल झाला होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नाना वाहनातून उतरून पालखीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर नागपूरला रवाना होण्यासाठी नाना आपल्या वाहनाकडे निघाले. परंतु, पाय चिखलाने माखल्यामुळे ते धुण्यासाठी त्यांनी पाणी मागवले. त्यावेळी त्यांच्या वाहनाजवळ आलेल्या कार्यकर्त्याने पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले आणि यावरून वादाला सुरुवात झाली.
हे ही वाचा:
दिल्ली, पाटणासह देशातील ४० विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल!
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!
गोहत्येच्या संशयामुळे दोन गटात राडा!
गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!
खोटेपणात काँग्रेसचा "हात" कोणीच धरू शकत नाही.
जनतेला गुलाम समजून वाट्टेल तशी वागणूक देणाऱ्या नानांच्या नाना कळा पहा…@NANA_PATOLE pic.twitter.com/hn5SlMnbfA
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 18, 2024
मुळात म्हणजे नाना पटोलेंना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझे पाय चिखलाने खराब झाल्यामुळे कार्यकर्त्याने पाणी आणले. कार्यकर्ता वरून माझ्या पायावर पाणी ओतत होता आणि मी माझे पाय माझ्या हाताने धुवत होतो. परंतु, नानांचा हा दुटप्पीपणा भाजपने उघड केला आहे. भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की ‘नानांचे पाय स्वतः कार्यकर्ता पाणी ओतून आपल्या हाताने धुवत आहे’. दरम्यान, खोटेपणात काँग्रेसचा “हात” कोणीच धरू शकत नाही. जनतेला गुलाम समजून वाट्टेल तशी वागणूक देणाऱ्या नानांच्या नाना कळा पहा…असे ट्विट करत भाजपने जोरदार टीका केली आहे.