आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!

व्हिडीओ व्हायरल

आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!

अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये काही भागात पसरलेली आग अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दुर्घटनेत आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कोट्यवधी किमतीची घरे क्षणार्धात जळून खाक झाली आहेत. नजर जाईल तिकडे आगीचे तांडव दिसत आहे. आग रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप यश आलेले नाही. याच दरम्यान, पॅसिफिक पॅलिसेड्समधून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या लाडक्या कुत्र्याला मिठी मारून आनंदाने रडत आहे. शहरात पसलेल्या वणव्यामुळे तो कुत्रा हरवला होता. मात्र, कुत्र्याशी पुन्हा भेट झाल्यानंतर मालकाने त्याला छातीशी धरून देवाचे आभार मानले आहेत. त्यांच्या पुनर्मिलनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

केसी कोल्विन असे व्यक्तीचे नाव असून त्याने आपले घर आगीच्या दुर्घटनेत गमावले होते. या दुर्घटनेदरम्यान त्याचा लाडका कुत्रा ‘ओरियो’ त्याच्यापासून विभक्त झाला होता. त्यानंतर त्याने त्याचा शोध सुरु केला. आगीच्या दुर्घटनेमुळे ओरियोशी पुन्हा भेट होईल अशी त्याला खात्री नव्हती. मात्र, त्याने शोध सुरूच ठेवला. अखेर शोधा दरम्यान, ओरियो एका मातीच्या ढिगाऱ्यावर झोपला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर केसी कोल्विनने त्या भागात धाव घेतली आणि ओरियोसोबत पुन्हा भेट झाली.

ओरियोला पाहून केसी कोल्विन स्तब्ध राहिला. ओरियोने त्याला पाहून धाव घेतली. यानंतर दोघांची भेट बघण्यासाठी होती. केसी कोल्विनने ओरियोला खांद्यावर घेवून नाचू लागला, दोघ्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. “अरे देवा! तू जिवंत आहेस! अरे हनी!”, असे उद्गार कोल्विनच्या तोंडून निघाले. यावेळी त्याने देवाचे आभारही मानले. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी लाईक केले आहे.

हे ही वाचा : 

ग्रूमिंग गँग फाईल्स: ब्रिटनमधील अत्याचार, हत्या, बलात्काराचे भयंकर वास्तव!

निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!

अपघातग्रस्तांना पहिल्या तासात मदत करणाऱ्यांना २५ हजार बक्षीस मिळणार

आसाम-त्रिपुरामध्ये ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक, दलालही ताब्यात!

 

Exit mobile version