आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका लग्न समारंभात विचित्र प्रकार घडला.वधूच्या कुटुंबीयाने लग्न समारंभातील पाहुण्यांवर मिरचीच्या पावडरचा हल्ला केल्याने परिसरात या लग्नाची जोरदार चर्चा आहे.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये वधूच्या कुटुंबियांनी वराच्या पाहुण्यांवर केलेली मिरची पावडरची धूळवड दिसत आहे.स्नेहा असे वधूचे नाव असून तिला लग्न समारंभातून तिचे कुटुंबीय पळवून नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
वधूचा भाऊ, तिची आई आणि एक चुलत भाऊ तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.तर वराचे कुटुंबीय त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत.बत्तीना व्यंकटानंदू असे वराचे नाव असून या दोघांचा लग्नसोहळा कडियम भागात पार पडला.मात्र, स्नेहाच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमस्थळी घुसून पाहुण्यांवर हल्ला करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.वराच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या मित्रांनी हा अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला.परंतु या झटापटीत वधूच्या कुटुंबीयांनी अडवणाऱ्या लोकांवर मिरचीच्या पावडरचा हल्ला केला.या हल्ल्यात वराचा एक मित्र जखमी झाला आहे.
हे ही वाचा:
बारामतीत तुतारी घेतलेल्या माणसाविरुद्ध ‘तुतारी’
बँकॉकहून आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत सापडले पिवळ्या जातीचे १० ॲनाकोंडा!
राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!
केक खाल्ल्याने मुलीचा मृत्यू; पंजाबच्या बेकरीतील केकमध्ये सिंथेटिक स्वीटनरचे अधिक प्रमाण!
या संदर्भांत माहिती देताना कडियाम सर्कल इन्स्पेक्टर बी तुलसीधर यांनी सांगितले की, वधूच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला, अपहरणाचा प्रयत्न आणि सोन्याची चोरी यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, वधूच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोध करण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.