एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!

विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप

एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!

सुमारे ३८९ प्रवासी आणि १३ विमान कर्मचाऱ्यांसह पॅरिसला जाणाऱ्या एअर कॅनडाच्या विमानाला टोरोंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच आग लागल्याची दुर्घटना ५ जून रोजी घडली. तसेच, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.

बोईंग ७७७ जेटच्या विमानाने टोरंटो येथून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात विमान आणखी उंच जात असताना विमानाच्या एका इंजिनमधून आग लागल्याचे दिसून येत आहे. आग लागली असली तरी विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात यश आले असून कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
‘काही तांत्रिक बाबींमुळे इंजिनला आग लागली आहे. हवेच्या झोतामुळे ही आग आणखी पेटली. आगीची बाब कळताच विमान कर्मचाऱ्यांना त्वरित ही बाब कळवण्यात आली.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!

संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!

जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!

‘पवन कल्याण’ ठरले आंध्रच्या निवडणुकीतले वादळ

त्यानंतर योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्यात आली आणि विमान परत विमानतळावर उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर, त्याची तपासणी करण्यात आली,’ असे एअर कॅनडा या हवाई वाहतूक कंपनीने निवेदनातून स्पष्ट केले आहे. या विमानातील प्रवाशांना त्यानंतर दुसऱ्या विमानाने पाठवून देण्यात आले. ‘द स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिघाड झालेल्या बोईंग जेटला तूर्त तरी सेवेतून बाहेर ठेवण्यात आले असून त्याची तपासणी इंजिनीअर व कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

बोईंगच्या विमानांच्या सुरक्षेबद्दल चिंता
बोईंग ७७७ जेट विमानांच्या अपघातांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. त्यामुळे विमानांच्या सुरक्षेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या वर्षी ७ मार्च रोजी युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग ७७७-२०० विमानाला सॅन फ्रान्सिस्को येथून टेकऑफ दरम्यान टायर घसरल्याने लॉस एंजेलिसमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून, टायरच्या ढिगाऱ्यामुळे कार पार्कमधील वाहनांचे नुकसान झाले आहे. १३ मार्च रोजी, युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग ७७७-३०९ विमानाला टेकऑफनंतर इंधन गळती झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये वळवून तिथे उतरवण्याची वेळ आली होती. हे विमान सॅन फ्रान्सिस्कोला जात होते.

Exit mobile version