23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषरणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!

रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!

विदर्भ विरुद्ध मुंबई अंतिम सामनाची १० मार्चला सुरुवात

Google News Follow

Related

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफाइनलच्या सामन्यात विदर्भाने मध्य प्रदेशचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे.आता विदर्भ विरुद्ध मुंबईचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे.यावेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये महाराष्ट्राच्या दोन संघांमध्ये लढत होताना दिसणार आहे.रणजी ट्रॉफीची फायनल वानखेडे स्टेडियमवर १० मार्चपासून सुरु होणार आहे.४१ वेळा जिंकली मुंबई आता ४२ च्या विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे तर विदर्भ तिसऱ्यांदा जिंकण्याच्या उद्देशाने खेळणार आहे.

विदर्भाने मध्य प्रदेशचा ६२ धावांनी पराभव करत फायनल गाठली.३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा दुसरा डाव २५८ धावांवर आटोपला. नागपुरात खेळल्या गेलेल्या या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात १७० धावा केल्या.प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा पहिला डाव २५२ धावांवर संपला. त्यांनी ८२ धावांची आघाडी घेतली. विदर्भाने दुसऱ्या डावात ४०२ धावा केल्या आणि त्यातून ८२ धावा वजा केल्यावर त्यांची आघाडी ३०२ धावांची झाली. अशाप्रकारे मध्य प्रदेशला ३०३ धावांचे लक्ष्य मिळाले.या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा संघ २५८ धावांत गारद झाला.

हे ही वाचा :

पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यास ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरकडून संरक्षण

वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?

सचिन तेंडुलकर यांनी सांगितले स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे फायदे

आता विजेतेपदाच्या लढतीत विदर्भाचा सामना ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबईशी होणार आहे. १० मार्चपासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विदर्भ संघानेही दोनदा विजेतेपद पटकावले आहे.दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एका राज्याचे दोन संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत. दोन्ही वेळा महाराष्ट्राचेच संघ फायनलला आहेत. याआधी १९७१ मध्ये फायनलला मुंबईने महाराष्ट्र संघाला हरवेल होते.तर आता रणजी ट्रॉफी २०२४ च्या विजेतेपदासाठी
विदर्भ आणि मुंबई यांच्यात वानखेडे स्टेडियमवर लढत होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा