महाराष्ट्रात महायुतीने नोंदविलेल्या दणदणीत विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्रातील विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, विकास, उत्तम प्रशासन आणि सामाजिक न्याय यांचा महाराष्ट्रात विजय झाला आहे. खोटे नरेटिव्ह आणि फसवणूक यांचा या निवडणुकीत जबर पराभव झाला आहे. आज नकारात्मक राजकारणाचा अंत झाला आहे. परिवारवादाला मूठमाती मिळाली आहे. विकसित भारतासाठी महाराष्ट्र आता पूर्ण सज्ज झाला आहे. भाजपा आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. मी एकनाथ शिंदे आमचे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक करतो. मी महाराष्ट्रातील जनतेचे, माता भगिनींचे, शेतकऱ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेने अधिक वेगाने धावेल.
हे ही वाचा:
ठाकरे चक्क म्हणाले, राज्यातील जनतेने खचून जाऊ नये!
राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला
‘व्होटजिहाद विरुद्ध धर्मयुद्ध विजयी’
मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महान विभूतींच्या राज्याने जुने रेकॉर्ड मोडीतत काढले आहेत. गेल्या ५० वर्षात कोणत्याही पक्षाला किंवा युतीला मिळालेला हा मोठा विजय म्हणायला हवा. आमच्या सुशासनाच्या मॉडेलवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळेच गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश येथे लागोपाठ तीनवेळा आम्ही विजयी झालो.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा मोठा पक्ष ठरण्याचा मान भाजपाला मिळाला आहे. फक्त भाजपाला काँग्रेस आणि इतर पक्षांपेक्षा अधिक जागा जनतेने दिल्या आहेत.