इस्रायल-हमास युद्धाला सहा महिने पूर्ण होत असताना ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या मोरनने अशा आव्हानात्मक काळात भारत आणि तेथील लोकांच्या दृढ समर्थनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. इस्त्रायलचा आवाज जागतिक स्तरावर वाढवण्यात भारताने जी भूमिका घेतली त्याबद्दल कबुली देऊन मोरेन म्हणाले,भारतीय लोक आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत. याबद्दल भारत सरकारचे आभार. सर्व भारतीयांचे देखील आभार, असे म्हणत मोरेन यांनी भारताच्या अखंड समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा..
प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा!
मविआमध्ये काँग्रेस बॅकफूटवर; सांगलीची जागा ठाकरेंसाठी सोडली तर भिवंडीची शरद पवार गटासाठी
काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनीही भारत पहिल्या क्षणापासूनच दहशतवादाविरोधात जोरदार असल्याचे म्हटले आहे. नाओर गिलॉन म्हणाले, हमासने ७ ऑक्टोबर रोजी हल्ला सुरू केल्यानंतर इस्रायल भारत सरकारच्या पाठिंब्याचे कौतुक करत आहे.३० जानेवारी रोजी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गिलॉन म्हणाले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षादरम्यान इस्रायलला भारतीय लोकांकडून जबरदस्त पाठींबा मिळाला आहे. इस्रायल-हमास संघर्षाबाबत भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना गिलॉन म्हणाले, भारत पहिल्या क्षणापासून दहशतवादाविरुद्ध खूप मजबूत होता. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच जोरदार निंदा केली होती, तेव्हापासून भारत सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे खूप कौतुक करतो.
इस्रायलने ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिआक्रमण सुरू केल्यानंतर गाझामधील युद्ध सुरूच आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले जागतिक नेत्यांपैकी एक होते.