व्यष्टी, समष्टी ते सृष्टी आणि परमेष्टी! जन्मापासून आपल्या अस्तित्वाशी जुळलेला शब्द म्हणजे ओळख! आणि संपूर्ण जीवन म्हणजेही ती शोधण्याचा एक दीर्घ प्रवास. भारतीय विचार साधना ‘ओळख’ ह्या संकल्पनेवर आधारित विविध लेख आपल्या विचारभारती ह्या दिवाळी अंकामधून घेऊन येत आहे.
डॉ. अनघा लवळेकर लिखित पंचकोश आणि स्व – जाणीव ह्या लेखापासून ते व्यक्तीला स्वतःच्या नावातून मिळणारी ओळख, जेन्डर ओळख, वैयक्तिक ओळख आणि कायदा, माझी धार्मिक, सांस्कृतिक ओळख अशा विविध लेखांमधून वैयक्तिक ते सामाजिक आशय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामध्ये विविधतेमुळे ओळखीमधून होणारा संघर्ष आणि राजकारण आणि तरीही भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवणारी त्यांची अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला अंकामध्ये वाचायला मिळतील. ओळख ही वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर ओळख द्वैताचा संघर्षही निर्माण करणारी आणि ‘ईशावास्यमिदं सर्वं’ म्हणून विलीन होणारीही. डॉ. सच्चिदानंद शेवडे ह्यांनी लिहिलेल्या अध्यात्मिक लेखाने अंकाला एक उंची प्राप्त झाली आहे. अनेक मान्यवरांनी ह्या अंकासाठी लेखन केले आहे.
हे ही वाचा:
… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित
चित्रपटगृहात पाहता येणार टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
विचारभारती या दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत भारतीय विचार साधना सभागृह, १२१५/१२१७ सदाशिव पेठ, पेरुगेट भावेस्कूलच्या मागे, म.ए.सो.भवन प्रिमायसेस, टिळक रोडमागे, पुणे ३० येथे हा कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने माधुरी सहस्रबुद्धे यांनी स्थापन केलेल्या स्वयंपूर्ण, FHDAF या संस्थांबद्दल जाणून घ्यायचे आहे. वसुधैव कुटुंबकम, या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या mothers of wheels, शिवतांडव स्तोत्र पठण इ. उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दलही मुलाखतीतून जाणून घेता येणार आहे. ही मुलाखत विनिता तेलंग, सांगली घेणार आहेत.
संपर्क : भारतीय विचार साधना कार्यकारी मंडळ ९३५९५ २७२४५