विश्वचषक खोखो स्पर्धेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले उद्धाटन, भारताची विजयी सुरुवात

खो-खो विश्वचषकाला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रारंभ

विश्वचषक खोखो स्पर्धेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले उद्धाटन, भारताची विजयी सुरुवात

भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरवात झाली व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या.

तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा सुध्दा उपस्थित होत्या. यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी, सह सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे.

स्पर्धेतील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी उद्घाटन प्रसंगी संचालनात भाग घेतला व संपूर्ण मैदानाला फेरी मारून उत्साह वाढवणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. या संचालनात भारतीय महिला खेळाडूंनी साडी परिधान करून आपल्या देशाची परंपरा व संस्कृती जपत एक वेगळा संदेश दिला. यावेळी भारताचे कर्णधार प्रतिक वाईकर व प्रियांका इंगळे यांनी शपथ घेतली. त्यावेळी इतर देशांचे कर्णधार त्यांच्या मागे उभे राहून शपथ घेतली. तसेच भारत विरुध्द नेपाळ सामन्यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. सामना जवळजवळ ८:३० वाजता सुरु झाला.

भारताची संघर्षपूर्ण विजयी सलामी

आज झालेल्या भारत विरुध्द नेपाळ या उद्घाटनीय सामन्यात भारताने नेपाळला मध्यंतरापर्यंत २४-२० नेपाळने भारताचा फेस काढला. अनुभवी भारताच्या खेळाडूंपुढे नेपाळने तगडे आव्हान निर्माण केले होते. मार्च २०२३ मध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेत सुध्दा नेपाळने भारताला अंतिम सामन्यात चांगली लढत दिली होती. आज पुन्हा एकदा या पहाडी मुलांनी कमालीचा खेळ करत भारतासमोर तगड आव्हान निर्माण केले होते यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी भारताने ४२-३७ असा काठावर विजय मिळवत भारताने संघर्षपूर्ण विजयी सलामी दिली.

सामने :

पुरुष (सकाळी १०.३० पासून) : साऊथ आफ्रिका-घाना, बांगलादेश- श्रीलंका, इंग्लंड-जर्मनी, घाना-नेदरलँडस , पेरू- भूतान,अर्जेंटिना-इराण, दक्षिण कोरिया- पोलंड, मलेशिया- केनिया, दक्षिण आफ्रिका नेदरलँडस, बांगलादेश-अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, नेपाळ- पेरू, घाना-अर्जेंटिना, भारत-ब्राझील (रात्री ८.१५).

महिला (सकाळी ११.४५ पासून) : इंग्लंड- ऑस्ट्रेलिया, नेपाळ- भूतान, दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड, श्रीलंका-बांगलादेश, केनिया- नेदरलँडस, इंग्लंड-युगांडा, भारत-दक्षिण कोरिया (रात्री ७ वा. ), दक्षिण आफ्रिका-पेरू, नेपाळ-जर्मनी, इराण-मलेशिया (रात्री ७.४५).

Exit mobile version