राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला

‘राम, रामत्वमध्ये सहभागी व्हा’

राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी फेटाळले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्यावर टीका केली आहे. एका कम्युनिस्टकडून यापेक्षा वेगळ्या प्रतिसादाची अपेक्षा करू शकत नाही, अशा शब्दांत विहिंपने येचुरींवर शरसंधान साधले आहे. तसेच, ‘सीताराम हे राम, रामत्व आणि भारत सोडून त्यांचे हित चांगल्या प्रकारे साधू शकतील,’ अशी टीकाही केली आहे.

माकपनेते येचुरी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. तसेच, धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीचा भाग आहे. त्याचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर करता कामा नये, असे येचुरी यांनी स्पष्ट केले होते. मात्र विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सर यांनी यावरून येचुरी यांना लक्ष्य केले आहे. ‘अशा बातम्या यात आहेत की, ज्यांचे नाव सीताराम आहे, ते अयोध्याधामला जाणार नाहीत. राजकीय विरोध समजू शकतो. मात्र कोणाला जर स्वतःच्या नावाबद्दलच इतका तिरस्कार असेल, तर ती व्यक्ती केवळ कम्युनिस्टच असू शकते,’ अशा शब्दांत त्यांनी ‘एक्स’वर येचुरी यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा:

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !

येचुरी यांच्या पक्षाची बांधिलकी वेगळी असू शकते, मात्र माकपच्या सरचिटणीसांचा विरोध रामाला आहे की, स्वतःच्या नावाला हे समजू शकले नाही, अशीही टिप्पणी त्यांनी केली आहे. तसेच, याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही मागितले आहे. ‘संपूर्ण देश राम आणि रामत्वाकडे जात आहे. तुम्ही किती काळ याला विरोध करणार? तुम्हीही या राम, रामत्व आणि भारतामध्ये सहभागी व्हा. सद्यपरिस्थितीत हेच योग्य आहे. अन्यथा कसा प्रतिसाद द्यायचा, हे नागरिक चांगलेच जाणून आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version