वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या निर्णयाला विहिंपचा विरोध

राज्यातील सरकारने वक्फ बोर्ड मजबूत करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या सरकारचा हा निर्णय धर्माच्या आधारावर तुष्टीकरण करण्यासारखे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण आणि सवलती देणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला ताकत देणे हे कदापि सहन केले जाणार नाही. राज्य सरकारला आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. अन्यथा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत हिंदू समाजाचा रोषाला सामोरे जावे लागेल, असे सालेकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version