‘हिंदू मुलींनी’ मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची घेतली शपथ!

'विश्व हिंदू परिषदे'च्या महिला सदस्यांकडून 'शक्ती यात्रा'

‘हिंदू मुलींनी’ मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची घेतली शपथ!

देशभरात लव्ह-जिहादचे प्रकरणे अनेक समोर येत आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि नंतर मारहाण करत त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण करायचे, असे अनेक ठिकाणी घडले-घडत आहे. अशी लोक हिंदू मुलींच्या संपर्कात येण्यासाठी कोणत्या-ना-कोणत्या बहाण्याचा वापर करतात. अशाच घटनेला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील हिंदू तरुणींना मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची शपथ देण्यात आली आहे.

‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘मातृशक्ति-दुर्गा वाहिनी’च्या महिला सदस्यांनी दुर्गाष्टमीनिमित्त आज (७ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरून ‘शक्ती यात्रा’ काढली. या यात्रेत मोठ्या प्रमाणत लहान-मोठ्या मुली, महिला डोक्यावर भगवा फेटा, हातात झेंडे घेवून सहभागी होत्या. शक्ती यात्रेनंतर सर्व युवतींना मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची घेतली शपथ देण्यात आली.

हे ही वाचा : 

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमधून करणार मतदान

मणिपूरमधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

लँड फॉर जॉब घोटाळा: लालू प्रसाद यादव यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

‘मातृशक्ति-दुर्गा वाहिनी’च्या एका महिला सदस्येने सांगितले की, हिंदू मुली-महिलांचा हात कोणी मुसलमानाने पकडावा अशी आमची इच्छा नाही. कारण हा असा विषय आहे, जेव्हा हिंदू मुली मेहंदी काढण्यास जातात तेव्हा त्यांच्या मोबाईल नंबरची देवाण-घेवाण होते, जेणेकरून पुढे काही काम असेल तर सांगावे यासाठी. परंतु, मोबाईल नंबरच्या देवाण-घेवाणमुळे लव्ह-जिहादच्या घटना घडत आहेत, असे महिलेने सांगितले.

Exit mobile version