हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!

देशभरात आंदोलन करून व्यक्त केला निषेध

हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने देशभर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाबरोबर महाराष्ट्रातसुद्धा सर्व जिह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी निदर्शने करत पुतळे जाळण्यात आले. घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज या आंदोलनात सहभागी झाला होता. हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांचा बिमोड करावा, अशी मागणी यावेळी विहिंप आणि बजरंग दलाकडून करण्यात आली.

या हल्यात १० निष्पाप यात्रेकरूंचा मृत्यू झाला. याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या निषेधार्थ देशभरात अनेक ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पुतळे दहन केले. केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात ठोस पावले उचलून कारवाई करावी, अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

हे ही वाचा:

इटलीत खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना!

मुख्यमंत्री महोदय, वक्फ बोर्डाला १० कोटी देऊन मतं मिळतील का?

मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!

टँकर माफियांवर कारवाई करता येत नसल्यास पोलिसांना सांगतो; सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला खडसावले

दिल्ली, लखनऊ मधील हजरतगंज, राजस्थान मधील जैसलमेर, मध्यप्रदेशातील महाकौशल, वाराणसीमध्ये विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्रातही हे आंदोलन ताकतीने करण्यात आले. मुंबईत अंधेरी, नागपूर, बुलढाण्यातील खामगाव यासह जिल्हा केंद्रावर आंदोलन पार पडले.

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी रविवार, ९ जून रोजी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात बस चालकाला गोळी लागली. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या खड्ड्यात गेली. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर देशभरातून विशेषतः हिंदू समाजातून संताप व्यक्त होत होता. हे कृत्य करणारी जी आतंकवादी संघटना असेल त्याचा शोध घेऊन अशा संघटनेची पाळेमुळे खोडून काढून संघटना नष्ट कराव्यात, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

Exit mobile version