लव्ह जिहाद, सक्तीच्या धर्मांतराविरोधात ५ लाख लोकांना जोडणार
विश्व हिंदू परिषदेने ज्यांचे पूर्वज हिंदू होते त्यांच्या घरवापसीची मोहीम जाहीर केली आहे. संगमनगरी प्रयागराज येथे झालेल्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिंदू धर्म सोडून गेलेल्या अशा लोकांशी संपर्क साधून त्यांची मूळ धर्मावरील श्रद्धा जागृत करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यांच्या घरी परतण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या बैठकीत धर्मांतर रोखण्यासाठी संघटनेचे काम घरोघरी पोहोचवण्याचा निर्णयही विहिंपने घेतला.
विहिंप परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मावर हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यासाठी आता काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांमध्ये हितचिंतकांची मोहीम राबवून पाच लाख लोकांना संघटनेशी जोडले जाणार आहे. संस्थेची ही मोहीम ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
हिंदूंना जोडण्याचा सतत प्रयत्न
धर्मांतरासोबतच लव्ह जिहादवरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी चंपत राय म्हणाले की, विहिंप सातत्याने हिंदूंना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असून लोकांना धर्मांतराचे आमिष दाखवले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण पुढे यायला हवे.
हे ही वाचा:
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
विविध कार्यक्रम आयोजित करणार
विहिंपची ही दोन दिवसीय बैठक २३ आणि २४ जुलै रोजी प्रयागराजच्या आरडी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंपत राय यांनी संस्थेच्या इतर कार्यक्रमांचीही माहिती दिली. संस्थेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त विहिंपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, राष्ट्र एकसंध करण्यासाठी संघटनेच्या स्थापना दिनाचे कार्यक्रम १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित केले जातील.