प्रख्यात गायिका आशा भोसले यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी 

विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक, प्रशांत दामले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

प्रख्यात गायिका आशा भोसले यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी 
यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला  होता. विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २४ एप्रिलला मंगेशक कुटुंबियांकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो .  २४ एप्रिल ही  मास्टर दीनानाथ यांची पुण्यतिथी आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठेचा मला जाणारा  दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २०२३ रोजी  मुंबईच्या  सायन येथील   श्री षण्मुखानंद हॉल मध्ये होणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 गेल्या वर्षीपासून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली. आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या  व्यक्तीलाहा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. . गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ लतादीदींच्या लहान बहिणीला  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.

 

हे ही वाचा:

पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

भरमसाठ संख्या वाढल्यामुळे १ लाख माकडे श्रीलंकेतून निघाली चीनला

२४ हजार फुटांवर रेडिओ संपर्क तुटला, अखेर बलजित सापडली

अतिक अहमदची बेहिशोबी मालमत्ता, ११,६८४ करोडच्या घरात !

यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’ श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा) विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
Exit mobile version