ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन

महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे आज पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पती ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकप्रभा’चे माजी संपादक प्रदीप वर्मा यांनी ही माहिती दिली. मराठी साहित्यक्षेत्र, पत्रकारितेमध्ये पुष्पा त्रिलोकेकर यांचं मोठं योगदान आहे. पुष्पा त्रिलोकेकर यांच्या निधनानं मराठी पत्रकारितेचं मोठं नुकसान झालं असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. निर्भय आणि निर्भीड पत्रकारिता ही पुष्पा त्रिलोकेकर यांची ओळख होती. आक्रमक पत्रकारिता आणि ओघवती भाषा त्यांनी आचार्य अत्रेंकडून आत्मसात केली होती.

पुष्पा त्रिलोकेकर यांनी मराठामधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. मराठा बंद झाल्यावर त्यांनी सायंदैनिक ‘पहारा’ सुरु झाले. या सायंदैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी  स्वीकारली.  आणीबाणीच्या पहाराच्या माध्यमातून त्यांनी निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काटछाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून सरकारला सळो की पळो करून सोडले. यामुळं त्यांना अनेक नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी काही काळ ब्लिट्झमध्ये नोकरी केल्यानंतर त्या मुक्त पत्रकार म्हणून लेखन केले. साप्ताहिक श्री, साप्ताहिक लोकप्रभा, दैनिक प्रत्यक्ष, दैनिक कृषिवल, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती आदी साप्ताहिक पुरवण्यात विविध विषयांवर लेखन सुरू केले.

पुष्पा त्रिलोकेकर यांचा स्वयंपाकात देखील चांगला हातखंडा होता. ‘द्रौपदीची थाळी’ हे त्यांचे पाककृतींवरचे पुस्तक अतिशय गाजले होते. खपांचे अनेक विक्रम या पुस्तकाने मोडीत काढले. यासोबतच त्यांच्या प्रकाशनगरी काशी, देवांची जन्मकथा, पृथ्वीचे मारेकरी (प्रदूषण विषयावर), गर्द अंधार (अंमली पदार्थांच्या दुनियेवर), मिशन अंतरिक्ष (सायन्स फिक्शन) या पुस्तकांचा विशेष उल्लेख करता येईल.

हे ही वाचा:

व्हॉट्सऍप्पची नांगी, सरकारच्या नियमांचं पालन करणार

अफगाण महिला तालिबान विरुद्ध शस्त्रसिद्ध

बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार

नव्या रेल्वे मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

पुष्पा त्रिलोकेकर यांचा प्रतिमाशास्त्र हा विशेष अभ्यासाचा विषय होता. त्यासाठी भारत भ्रमण केले होते.  पुष्पाबाई आणि प्रदीप वर्मा यांनी ‘संस्कृती संवर्धन अभियाना’ची निर्मिती केली. त्याद्वारे या विषयाचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या विविध व्हिडिओ फिल्म्स तयार केल्या.

Exit mobile version