ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक शिरीष कणेकर यांचे निधन

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक शिरीष कणेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक शिरीष कणेकर यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं. खोचक, चिमटा घेणारे लेखन ही त्यांची खासियत होती.

गेल्या महिन्यात ६ जून रोजी त्यांनी ८० वा वाढदिवस साजरा केला होता. समाजकारण, साहित्य, राजकारण आणि संस्कृती या क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांचे लेखन प्रसिद्ध होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष लोकपसंतीस उतरले होते.

इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केलं. लोकसत्ता, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, सामना, लोकमत, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.

हे ही वाचा:

इर्शाळवाडी दुर्घटनेत पोरक्या झालेल्या मुलांना हवाय भावनिक आधार

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!

टँकरमधून आरडीएक्स नेत असल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

शिरीष कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. याशिवाय साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या जाण्यानं साहित्य, क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version