मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नांदलस्कर यांच्या निधनाला कोरोना कारणीभूत ठरला आहे.
देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातले अनेक नागरिक हे दर दिवशी कोरोनाचा बळी ठरत आहेत. जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ठाणे येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते, जिथे त्यांच्यावर उपचार होते. पण उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले आहे.
हे ही वाचा:
राज्यांनी लक्षात ठेवावे, लॉकडाउन अंतिम पर्याय!
महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध
राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
‘इना,मिना,डिका’ या चित्रपटातून किशोर नांदलस्कर यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्यामध्ये अनेक भूमिका केल्या. वास्तव, जिस देस में गंगा रहता है, सिंघम, सिम्बा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
अभिनेता रणवीर सिंह यांनी किशोर नांदलस्कर यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नांदलस्कर यांचा फोटो पोस्ट केला आहे आणि सोबत एक ‘ब्रोकन हार्ट’ टाकला आहे. रणवीर सिंह आणि किशोर नांदलस्कर यांनी ‘सिम्बा’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.