कोलकाता-बंगळुरू सामन्यात व्यंकटेशचा रोमँटिक अंदाज

अर्धशतकानंतर दिला फ्लाइंग किस

कोलकाता-बंगळुरू सामन्यात व्यंकटेशचा रोमँटिक अंदाज

व्यंकटेश अय्यरने आरसीबीविरुद्ध दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. केकेआरने हा सामना ७ गडी राखून जिंकला. आयपीएल २०२४ च्या दहाव्या सामन्यात अर्ध शतकानंतर पॅव्हेलियनकडे पाहताना त्याने ‘फ्लाइंग किस’ दिला. व्यंकटेशची जोडीदार श्रुती रघुनाथनही हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होती.

वेंकटेश आरसीबीविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने ३० चेंडूंचा सामना करत ५० धावा चोपून काढल्या. व्यंकटेशने या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्याने अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. व्यंकटेशने अर्ध्या शतकानंतर आपली जोडीदार श्रुतीला फ्लाइंग किस दिले. हा सामना पाहण्यासाठी श्रुती मैदानात उपस्थित होती.

श्रुती आणि व्यंकटेश यांचा नोव्हेंबर २०२३ रोजी साखरपुडा झाला आहे. व्यंकटेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. श्रुती व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. श्रुतीने बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. यासोबतच फॅशन मॅनेजमेंटची पदवीही घेतली आहे.

व्यंकटेशची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द पाहिली तर त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने ३८ सामन्यात १०१३ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ८ अर्धशतके त्याने झळकावली आहेत. व्यंकटेशने यंदाच्या मोसमात २ सामन्यात ५७ धावा केल्या आहेत. व्यंकटेशने गेल्या मोसमात १४ सामन्यात ४०४ धावा केल्या होत्या. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

आयपीएलमध्ये राजस्थानचा सलग दुसरा विजय

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला

डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

कोलकाता नाईट रायडर्सने सलग दोन सामने जिंकले आहेत. पहिला सामना ४ धावांनी जिंकला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला. केकेआरचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना ३ एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.

Exit mobile version