24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषवेंगसरकर यांचे योगदान गावस्कर, तेंडुलकरपेक्षाही मोठे

वेंगसरकर यांचे योगदान गावस्कर, तेंडुलकरपेक्षाही मोठे

अष्टपैलू खेळाडू करसन घावरी यांचे मत

Google News Follow

Related

दिलीप वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान हे सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही कितीतरी मोठे असल्याचे मत भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू करसन घावरी यांनी व्यक्त केले.

ओव्हल मैदान, चर्चगेट येथे ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर वेंगसरकर यांनी ज्या पद्धतीने तीन-तीन अकादमी निर्माण करून छोट्या खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून उदयोन्मुख खेळाडूंच्या गुणवत्तेला खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत ते नक्कीच अनुकरणीय आहे, असे घावरी म्हणाले.

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत एम.आय.जी. संघाने गणेश पालकर क्रिकेट क्लब संघावर केवळ सात धावांनी सनसनाटी विजय मिळवत ड्रीम ११ कप वर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाची छाप पाडणारा वेदांग मिश्रा हा एम.आय. जी.च्या विजयाचा शिल्पकार ठरला.

एम.आय. जी. संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद १४४ धावांची मजल मारली. सलामीवीर अगस्त्य काशीकर (नाबाद ५९) आणि वेदांग मिश्रा (४७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची दमदार भागीदारी रचली तर त्यानंतर अगस्त्याने प्रेरित राऊत (नाबाद २८) याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची अभेद्य भागीदारी रचून आपल्या संघाला २ बाद १४४ धावांचे लक्ष्य उभारण्यास मदत केली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना सन्मित कोथमीरे (३५) आणि डावखुरा सिद्धांत सिंग (४५) यांनी झुंजार प्रयत्न केले. मात्र अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांचे प्रयत्न ७ धावांनी अपुरे पडले. २० षटकांत त्यांना ९ बाद १३७ धावांचीच मजल मारता आली. राजवीर लाड याने २४ धावांत ३ बळी मिळवत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. वेदांग मिश्रा याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पारितोषिकासह स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी कसोटीवीर करसन घावरी,  नाईक फिशरीसचे निस्सार नाईक, दीपक जाधव आणि ड्रीम ११ चे प्रशांत तायडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांना मुंबईबाहेर जाण्याची न्यायालयाची परवानगी

होऊ द्या लष्करी खर्च! भारत चौथ्या स्थानावर

छोट्या शाल्मलीने वाजविलेला पियानो पंतप्रधान मोदींनाही भलताच आवडला!

समलिंगी विवाहाच्या मान्यतेचा अट्टहास

संक्षिप्त धावफलक :  एम.आय.जी. २० षटकांत २ बाद १४४ (अगस्त्य काशीकर नाबाद ५९, वेदांग मिश्रा ४७, प्रेरित राऊत नाबाद २८) वि.वि. गणेश पालकर क्रिकेट क्लब – २० षटकांत ९ बाद १३७ (सन्मित कोथमीरे ३५, सिद्धांत सिंग ४५; राजवीर लाड २४ धावांत ३ बळी ).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा