23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबांगलादेशी-रोहिंग्यांचा बाजारात प्रवेश, भाजी विक्रेत्यांना गाड्यांवर नावे लिहावे लागणार!

बांगलादेशी-रोहिंग्यांचा बाजारात प्रवेश, भाजी विक्रेत्यांना गाड्यांवर नावे लिहावे लागणार!

भाजप नगरसेवक आणि मार्केट असोसिएशनची योजना

Google News Follow

Related

दिल्लीच्या नजफगढमधील भाजी मंडईतील रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांची नावे गाड्यांवर लिहावी लागणार आहेत. बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना याठिकाणी भाजीपाला विकण्यापासून रोखणे हे उद्दिष्ट असल्याचे स्थानिक नगरसेवक आणि बाजार संघटनांचे म्हणणे आहे.

विक्रेत्यांना गाड्यांवरील नेमप्लेटवर त्यांचे फोन नंबर लिहिण्याचे निर्देशही मार्केट असोसिएशनने दिले आहेत. असोसिएशन नेमप्लेट जारी करेल, ज्यावर गाडी क्रमांक देखील लिहिला जाईल. ही योजना लागू करण्याचा निर्णय मार्केट असोसिएशनच्या स्थानिक नगरसेवकासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बांगलादेश आणि म्यानमारमधील अवैध स्थलांतरित भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपचे स्थानिक नगरसेवक अमित खरखारी म्हणाले की, हे पाऊल कोणत्याही व्यक्ती किंवा विशिष्ट समुदायाविरुद्ध भेदभाव करण्यासाठी नाही तर सुरक्षिततेसाठी उचलण्यात आले आहे. नजफगढ व्यापार मंडळाचे अध्यक्ष संतोष राजपूत म्हणाले की, आम्ही परिसरातील सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना आधार कार्ड सारखी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले आहे.

मार्केट असोसिएशन हा रेकॉर्ड कायम ठेवणार आहे. सुरक्षेसाठी, स्थानिक पोलिस तसेच दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) यांना माहिती दिली जाईल. असोसिएशनने सांगितले की, बाजारात सुमारे ३०० विक्रेते भाजीपाला विकतात, ज्यांची २०  नोव्हेंबरपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. गाड्यांवर नेमप्लेट लावल्यास भाजी मंडईची व्यवस्था सुधारेल, असे बाजार संघटनेने म्हटले आहे.

हे ही वाचा : 

‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

राजस्थान: मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून राडा; ६० जणांना अटक

अनेक पक्ष फोडणारे शरद पवार म्हणतात,‘पक्ष फोडायला अक्कल लागत नाही’!

मुस्लिम तरुणीवर प्रेम करणाऱ्या हिंदू तरुणाचे केले सात तुकडे

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा