प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे आपल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होतेच पण आता निवृत्त झाल्यावरही ते ट्विटरवर चांगलेच फॉर्ममध्ये असतात. मंगळवार, १३ जुलै रोजी वेंकटेश प्रसाद यांनी अशाच प्रकारे एका हिंदू विरोधी ट्विटर हॅंडलची दांडी गुल केली आहे.

सध्या सोशल मीडियावर नासामधल्या भारतीय इंटर्न्सचा फोटो हा चर्चेचा विषय ठरला आहे. नासाच्या ट्विटर खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये भारतातील त्यांच्या इंटर्न्सच्या मागे देवांच्या प्रतिमा दिसत आहेत. या फोटोवरून अनेकांना जळजळ होताना दिसत आहे. स्वतःला विज्ञानवादी म्हणवणाऱ्या अनेकांकडून या भावी वैज्ञानिकांना ट्रोल करण्यात आले.

हे ही वाचा:

स्पुटनिक व्ही लवकरच पुण्यात बनणार

आसाममध्ये येणार नवा गोरक्षण कायदा

मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?

गोखलेला न्यायालयाने ठोकले

या प्रकरणात मिशन आंबेडकर या संस्थेच्या ट्विटर खात्यावरून टीका करण्यात आली आहे. नासाचे हे ट्विट शेअर करताना त्याने असे म्हटले आहे की हे बघितल्यावर आम्ही असे म्हणतो नासाने सायन्सचा नाश केला.

त्यांच्या याच ट्विटला व्यंकटेश प्रसाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीसाठी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्राचीन शिवमंदिरावर केलेल्या अभिषेकाची बातमी प्रसाद यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केली आहे आणि सोबत लिहिले आहे की, “एकिकडे ती (नासाची इंटर्न) श्रद्धाळू आहे म्हणून तिची खिल्ली उडवणे. तर दुसरीकडे शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करून महान डॉक्टर आंबेडकर यांच्या नातवाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणे. बाबासाहेब आज असते तर त्यांचे नाव वापरणारे हे ट्विटर खाते बघून त्यांना लाज वाटली असती.

प्रसाद यांचे ट्विट मिशन आंबेडकर या ट्विटर हँडलला चांगलेच झोंबले असून त्यांनी व्यंकटेश प्रसाद यांना २२ प्रतिज्ञांचा दाखला देत उत्तर दिले. त्यांच्या या ट्विटलाही प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्हाला भक्ती,प्रेम आणि श्रद्धा या गोष्टींची कल्पना नाही असे वाटते. एखाद्या गोष्टी मागचा संदर्भ समजून न घेता स्वतःच्या सोईप्रमाणे एखादी गोष्ट विपर्यास करून मांडणे यातून तुमच्या गुंगी आलेल्या आणि उथळ समजुतीची साक्ष मिळते. तुमचा आशीर्वादावर विश्वास नसला तरीही देव तुम्हाला आशीर्वाद आणि सद्बुद्धी देवो” असा सणसणीत टोला प्रसाद यांनी लगावला आहे.

Exit mobile version