हरियाणामध्ये डोंगर खचला; एकाचा मृत्यू

हरियाणामध्ये डोंगर खचला; एकाचा मृत्यू

हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यात डोंगराचा मोठा भाग खचला असून यात सुमारे आठ ते दहा वाहने ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत. या वाहनांमधील अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यातील एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. घटनास्थळी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

भिवानी येथील डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भागातून वाहने जात असल्याने आणि ही दुर्घटना अचानक घडल्याने ढिगाऱ्याखाली ही वाहने अडकली आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरित मदतकार्याला सुरूवात केली आहे. याशिवाय कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्यात सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असून याखाली नेमकं किती नागरिक अडकले आहेत याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, यामध्ये साधारण १२ पेक्षा अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

गतवर्षी UPI द्वारे पन्नास लाखाहून अधिक कोटी रुपयांचे व्यवहार

नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!

भिवानीच्या डाडम खाण परिसरात झालेल्या दुर्दैवी घटनेने मी अत्यंत दु:खी आहे. बचाव कार्य आणि जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी स्वतः स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version