टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

 

कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसाय उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. रोजंदारीवर काम करणारे अनेक कामगार उपाशी मरत आहेत. पण सरकारला मात्र याविषयी कुठेही जाग आलेली नाही. टाळेबंदी जाहीर करताना सरकार कुठेही समाजातील या घटकांचा विचार करताना दिसलेली नाही. कोरोना महामारीमुळे आता वाहनचालक आणि मालक दोघेही अडचणीमध्ये आलेले आहेत. अनेक चालकांनी कुठेतरी धंदा व्हावा या हेतूने गाडी खरेदी केली. परंतु टाळेबंदीमुळे मात्र या व्यवसायावर गदा आलेली आहे. खरेदी केलेली गाडी व्याजावर असल्याने व्याज देणे भाग आहे. पण उत्पन्नाचे साधन बंद असल्यामुळे अनेकांना तोटा सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा:

अर्थगुरू आशीष चौहान आता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती

चोक्सी सापडला; आता भारताच्या स्वाधीन करणार?

लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?

हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

दुसरीकडे मात्र यापेक्षा अधिक भयाण चित्र आहे ते म्हणजे गॅरेजकामगारांचे. गॅरेजबंदी असल्यामुळे यांची अतिशय वाताहत होत आहे. टाळेबंदीमध्ये गॅरेजबंदी अजून उठवली नाही. गॅरेजमधून दिवसाला पोट भरणारे अनेक मजूर आहेत. रोजंदारीचा या व्यवसायाला टाळेबंदीच्या काळात फारच मोठा फटका बसलेला आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या निर्बंधामुळे वाहनचालकांचा रोजगारच धोक्यात आलेला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

एकीकडे फार विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. अनेक गाड्या आजही रस्त्यावर दिसतात. पण या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यावर मात्र दुरुस्त करण्याची सोयच नाही. गॅरेज बंद असल्यामुळे असलेल्या गाड्या दुरुस्तीशिवायच घरात पडून आहेत. वाहने दुरुस्त होत नसल्याने तसेच दुरुस्तीचे सामान मिळत नसल्यामुळे आयत्यावेळी खोळंबा होत आहे.

Exit mobile version