कर्नाटक काँग्रेसचा मुजोरीपणा, विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय!

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून निषेध

कर्नाटक काँग्रेसचा मुजोरीपणा, विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय!

कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सिद्धरामय्या सरकारने विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे तर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. उद्धव ठाकरे याचा निषेध करणार कि नेहमी प्रमाणे मुग गिळून गप्प बसणार ?, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे राज्यासाठी कोणतेही योगदान नसल्याने काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निषेध दर्शविला. ते म्हणाले, वीर सावरकर केवळ महाराष्ट्राचे नसून अवघ्या देशाचे आहेत. सावरकरांनी देशासाठी केलेल्या त्यागाची जाणीव कर्नाटक सरकारने ठेवली पाहिजे.

विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे या कर्नाटक विधानसभेच्या सभापतींशी संवाद साधून सावरकरांची प्रतिमा न काढण्याचे आवाहन करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. सरकार देखील या भूमिकेशी सहमत आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?

शक्तीकांत दास निवृत्त होणार, हे आहेत रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

‘हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत चिंतेत’

भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काँग्रेसवर टीका केली. ट्वीटकरत त्यांनी म्हटले, कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे.

ते पुढे म्हणाले, सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही.

Exit mobile version