…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत नवीन दोन महाविद्यालयांना नावे देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये एका महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव आणि दुसऱ्या महाविद्यालयाला दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंग ह्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. यासाठी अनेक नावांचे प्रस्ताव आले होते, मात्र त्यानंतर या दोन नावांची निवड करण्यात आली, असे कार्यकारी परिषदेच्या सदस्या सीमा दास म्हणाल्या.

या नवीन दोन महाविद्यालयांना नावे देण्यासंबंधीची संकल्पना प्रथम ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय झाला आहे. यावेळी इतरही नावे सुचवण्यात आली होती, मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरूंचा असतो, त्यांनी वीर सावरकर आणि स्व. सुषमा स्वराज यांच्या नावांची निवड केली.

हे ही वाचा:

परमबीर गेले बेल्जियमला?

युगायुगांत एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते…

‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’

जो जितेगा वही सिकंदर

दिल्ली विद्यापीठाने महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी स्वागत करतो. ही आजची आवश्यकता आहे. कारण आज राजकीय स्वार्थापोटी वीर सावरकर यांचा विषय वादग्रस्त विषय बनवून ठेवला जातो. सर्व राजकीय पक्ष हे तोंडात त्यांच्या समानतेची भाषा असते, पण जेव्हा निवडणूक जाहीर होते, त्यावेळी त्या त्या मतदारसंघातील जातीय समीकरणे काय आहेत, त्यावरच त्या त्या जातीचा उमेदवार ठरवला जातो. अशा परिस्थितीत वीर सावरकर यांचे जात निर्मूलनाचे विचार, विवेकी विचार अभ्यासले गेले पाहिजे. त्यांचे अनुकरण झाले पाहिजे. अशा वेळी शिक्षण क्षेत्रात नव्या महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय होणे, म्हणूनच स्वागतार्ह आहे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version