अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने जलतरण स्पर्धेत लुटले सोने

२०२२ मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली होती

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने जलतरण स्पर्धेत लुटले सोने

आर माधवनने आपल्या चित्रपट आणि अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर माधवन चांगले चित्रपट देऊन चाहत्यांची माने जिकंत आहे. पण आर माधवनचा मुलगा वेदांतने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत साऱ्या देशवासीयांची मने जिंकली आहेत. जलतरण स्पर्धेत त्याने ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची घवघवीत कमाई करून देशाचे नाव तर उंचावले आहेच पण आपल्या वडिलांसाठी देखील अभिमानस्पद कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर वेदान्तवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वेदांतने याआधीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेली आहेत. वेदांतने क्वालालंपूर येथे आयोजित केलेल्या मलेशिया आमंत्रण वयोगटातील जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला होता. वेदांतने या जलतरण स्पर्धेत भारतासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. आर माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचे काही फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला. आपल्या मुलासोबतची काही छायाचित्रे सोहळा मीडियावर शेअर केले आहेत.

‘देवाच्या कृपेने आणि आपल्या शुभेच्छांमुळे वेदांतला भारतासाठी पाच सुवर्णांसह (५०मीटर, १००मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि १५००मीटरमध्ये) दोन पीबी मिळाले अशा शब्दात आर माधवनने सगळ्यांचे आभार मानले आहेत. वेदांतने अशी दणदणीत कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याने आपल्या जलतरण कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे तीन वर्षांपूर्वी वेदांतने ज्युनियर नॅशनल स्विम मीटमध्ये सुवर्णपदक जिंकून आपले कौशल्य दाखवले आहे . वेदांतने ज्युनियर नॅशनल स्विम मीटमध्ये तीन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह चार पदके जिंकली होती.त्याने पहिल्या राष्ट्रीय एकेरी पदकाची कमाई केली होती .

हे ही वाचा:

प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार कारवाई

पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…

इतकेच नाही २०२२ मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत पाच सुवर्णपदके आणि दोन रौप्य पदकांवर त्याने नाव कोरले होते. वेदांत गेल्या काही वर्षांत भारतातील सर्वात आश्वासक जलतरणपटूंपैकी एक बनला आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने देशाला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. कोपनहेगन येथील डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत वेदांतने पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत स्थानिक जलतरणपटू अलेक्झांडर एल ब्योर्नचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी त्याने याच स्पर्धेत १,५०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

Exit mobile version