यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त नॅशनल जिओग्राफिकचा वन फॉर चेंज हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यात सहा तरुण विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कहाण्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ९ ते १७ या वयोगटातील हे तरुण चॅम्पियन्स बदल घडवून आणण्यासाठी वयाने लहान असले तरी त्यांचा विचार हा व्यापक आहे आणि याच विचारांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ येथील १५ वर्षीय बोधिसत्व गणेश खंडेरावचा समावेश आहे.नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला बोधिसत्व आणि त्याची आई अमृता खंडेराव यांनी अनेक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बिजगोळे निर्मतीचे प्रिशिक्षण दिले आहे. गेल्या १० वर्षांच्या प्रवासात अनेक विविध शिबिरे , कार्यशाळा आणि वृक्षरोपण लावणे अशा कृतींमुळे बोधिसत्वचे कार्य विस्ताराले आहे.
हे ही वाचा:
तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!
भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…
कृतयुग किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय (अक्षय्य) तृतिया
गेल्या वर्षभरात ‘वन फॉर चेंज’ ने पृथ्वीच्या संवर्धनासाठी बदल घडविणाऱ्या ३० दमदार कहाण्या जगासमोर मांडल्या होत्या. केवळ भारतातीलच २५६ दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत ही मोहीम पोहोचून त्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. हा प्रयत्न सुरू ठेवत, हे काम आता त्यांच्या तरुण सहकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असून आता अशा सहा तरुण प्रतिभावान बदल घडविणाऱ्यांवर प्रकाश झोत टाकण्यात येणार आहे, ज्यांनी आपल्या जिज्ञासू आणि कल्पक मनाने ग्रह संवर्धनासाठी हुशार उपाय शोधून काढलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केलेला आहे.या पंधरावर्षीय बोधिसत्वच्या कामावर ‘नॅशनल जिओग्राफी’ वर लघुपट तयार करण्यात आल्याने आता त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.
२००७, अमृता खंडेराव यवतमाळ जिल्ह्यातील निलोना जंगलाजवळील भोसा या छोट्याशा गावात राहायला गेल्या तेव्हा त्या परिसरातील घनदाट जंगलामुळे ती मंत्रमुग्ध झाली. सागवानाची झाडे इतकी दाट होती की तिला आकाश दिसत नव्हते, पण त्यामुळेच तिला आनंदी आणि संरक्षित वाटले.तथापि, जसजसा वेळ निघून गेला, तसतसे व्यावसायिक प्रकल्पांमुळे हे आवरण कमी होऊ लागले आणि जंगलतोड आणि जंगलातील आगीमुळे तिचे मन मोडले.अमृतासाठी ही जुनी झाडं आजी-आजोबांसारखी होती आणि त्यांना निरनिराळ्या कामांसाठी निर्दयीपणे कुऱ्हाड चालवताना पाहून ती रडली.
पथनाट्यांद्वारे आणि स्वगतांमधून स्थानिक समुदायाशी बोलताना, तिने लोकांना सांगण्याची एकही संधी सोडली नाही की झाडांची गरज आहे आणि जर कोणी ती तोडत असेल तर त्यांना नवीन झाडे लावण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.आईच्या कामाचे संपूर्ण निरीक्षण मुलगा बोधिसत्व करत होता.आईने बोधिसत्वला बिजगोळे बनवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले.बोधिसत्वने पहिलीत असताना हा प्रकल्प त्याने शाळेत सादर केला.शिक्षक आणि प्राध्यापकांना हा प्रकल्प फार आवडलं आणि त्याचा प्रवास सुरु झाला.विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीत त्याच्या आईने आणि त्याने बीजमहोत्सवचे आयोजन केले.आजूबाजूच्या शाळेचे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.
आयोजनात निशुल्क मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.याचा मुख्य एकमेव हेतू जंगले संपू नयेत हा होता.जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जंगलामध्ये सर्वत्र बिजगोळे टाकली त्यापैकी कित्येक झाडे यातून निर्माण झाली आहेत.मदत गट आणि ग्रामपंचायती याना भेट देऊन वृक्षलागवडीविषयी जनजागृती केली आहे.बोधिसत्वच्या कामाची दाखल घेत यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त नॅशनल जिओग्राफिकने या कार्यासंदर्भात लघुपटनिर्मित करण्यात आली आहे.नॅशनल जिओग्राफिक २२ एप्रिल २०२३ पासून सहा प्रभावी लघुपटांचा प्रीमियर करणार आहे आणि यामध्ये युवा प्रतिभावान बदल घडविणारे प्रमुख आकर्षण असतील.