‘वास्तव’ फेम अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

सुनील शेंडे यांची राहत्या घरी रात्री १ वाजता प्राणज्योत मालवली.

‘वास्तव’ फेम अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

वास्तव, सरफरोश, निवडुंग अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपली छाप पाडणारे अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले. त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपट, नाटक, मालिका अशा अनेक माध्यमांतून आपल्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांना पाडली आहे. सुनील शेंडे यांची राहत्या घरी रात्री १ वाजता प्राणज्योत मालवली.

रविवारी रात्री त्यांना अचानक फिट आली आणि ते राहत्या घरी कोसळले. त्यांना ताबडतोब नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज दुपारी बारा वाजता त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी पार्ले येथील त्यांची राहत्या घरी आणले गेले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून निघणार असून अंधेरी येथील पारशीवाडा हिंदू स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कुठलाही आजार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. परंतु एपिलेप्सीच्या किरकोळ त्रासातून ते जातं होते.

हे ही वाचा:

इस्तंबूलमध्ये महिलेने पार्सल ठेवले आणि स्फोट झाला, ६ ठार

आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

दरम्यान, गांधी या चित्रपटातून सुनील शेंडे यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. यशवंत, वास्तव, सरफोश, जिद्दी, गुनाह, निवडुंग, कृष्ण अवतार, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर, नरसिम्हा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उरले. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. कधी त्यांनी पोलिस ऑफिसरची भूमिका साकरली तर कधी ते डाकू बनले. कधी राजकारणी बनले तर कधी दरोडेखोर अशा अनेक वेगेवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उरतले. चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले. परंतु गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून ते दूर राहिले होते. सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, ऋषिकेश आणि ओमकार ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Exit mobile version