वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !

मनसेचे १७ शाखाध्यक्षही ठाकरे गटात

वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !

लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंगच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वसंत मोरे यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे. वसंत मोरेंसह तब्बल २१ मनसेच्या १७ शाखाध्यक्षांनी सुद्धा शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे.

राज ठाकरे यांच्या जवळीक मानल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करताच पुण्यामधून वसंत मोरेंना लोकसभेचे तिकिटे मिळाले आणि ते निवडणुकीला उभे राहिले. मात्र, भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी वसंत मोरे यांचा दारुण पराभव केला.

हे ही वाचा:

वरळी हिट अँड रन प्रकरण, जुहूतील ग्लोबल तपस बार सील!

मॉस्कोतून नरेंद्र मोदी म्हणाले, भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणार!

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !

लोकसभेत पराभव झाल्यानंतर वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली आणि वंचित बहुजन आघाडीकडून मते न मिळाल्याचा पक्षावर ठपका ठेवला. यानंतर वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचा विचार करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. वसंत मोरेंचे राजकारण म्हणजे आयाराम-गयाराम असल्याचे प्रकाश आंबेकरांनी म्हटले होते. दरम्यान, वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासह १७ मनसेच्या शाखाध्यक्षांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Exit mobile version