मुंबई, ठाणे परिसरात मागील २४ तासात वरुणराजाने हजेरी लावली आहे. काही दिवसापासून दडून बसलेला वरुणराजा समाधानकारक बरसायला लागला आहे. वरुणराजाची कृपा म्हणजे हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात कोसळतोय. तलावक्षेत्रात या हंगामातील एक दिवसातील सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. शनिवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीपातळीत जवळपास ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
हवामान खात्याने संपूर्ण जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे देव करो आणि हवामान खात्याचे भाकित खरे ठरो आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व तलाव तुडुंब भरो. तुळशी, विहार, भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.
हेही वाचा :
विशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !
विशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !
बसप कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येनंतर मायावतींचा सवाल; तामिळनाडूत कायदा-सुव्यवस्था कुठे आहे?
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा तर ५ दहशतवादी ठार!
हवामान खात्याने मुंबईत १० जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणात बुधवारपर्यंत येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.