वारकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.
एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तसेच दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशतः अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपये पर्यंतचा खर्च या योजनेअंतर्गत मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
हे ही वाचा:
इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा चाहता’
केवळ पैशासाठी मित्राच्या आईला मारणाऱ्यांना जन्मठेप
नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना स्पष्ट केले. सरकारच्या या घोषणेमुळे वारकऱ्यांणा मोठा दिलासा मिळाला आहे.