22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषविराट कोहलीची धावांसाठी ५१० किमींची ‘धाव’

विराट कोहलीची धावांसाठी ५१० किमींची ‘धाव’

४६ मैदानांवर लगावले शतक

Google News Follow

Related

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केली आहेत. कोहली याने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेच्या विरुद्ध त्याचा पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर विराटने आतापर्यंत १११ कसोटी, २७५ एकदिवसीय आणि ११५ टी २० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीमध्ये आठ हजार ६७६, एकदिवसीय सामन्यांत १२ हजार ८९८ आणि टी २०मध्ये चार हजार आठ धावा आहेत. कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. परंतु काही रंजक विक्रमही त्याच्या नावावर आहेत.

विकेटच्या दरम्यान धावांचा विक्रम

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका अहवालानुसार, गेल्या १५ वर्षांत विराट कोहली दोन विकेटदरम्यान २७६.५७ किमी धावला आहे. जेव्हा तो खेळपट्टीवर होता, तेव्हा त्याच्या सहकाऱ्यासाठी तो २३३.४८ किमी धावला आहे. अशा प्रकारे तो दोन विकेटदरम्यान तब्बल ५१०.०४ किमी धावला आहे. कोहली याने विनाचौकार १३ हजार ७४८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत खेळणाऱ्या फलंदाजांनी विनाचौकार ११ हजार ६०६ धावा केल्या आहेत. कोहलीने एकूण २४ हजार ३५४ धावा केल्या आहेत.

धावांचा पाठलाग करताना ५१८ सरासरी

सन २०१४ आणि २०१६च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत त्यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. या स्पर्धांमध्ये धावांचे लक्ष्य गाठताना जेव्हा त्याने फलंदाजी केली, तेव्हा भारताने १० सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले आहेत. तर, विराट आठवेळा नाबाद राहिला आहे. या दहा सामन्यांत विराट कोहलीची सरासरी २७०.५ आहे. किमान पाच वेळा खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या मार्कस स्टोइनिस (१४६) यांच्यापेक्षा ही सरासरी जवळपास दुप्पट आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना विराट कोहलीची सरासरी ५१८ आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॅमरून व्हाइट (१०४) याच्यापेक्षा विराट कोहलीची सरासरी जवळपास पाचपट अधिक आहे.

४६ मैदानांवर शतक

कोहलीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ८३ ठिकाणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४६ शतके ठोकली आहेत. ऍडलेड येथील ओव्हल मैदानावर त्याने पाच शतके ठोकली आहेत. कोहलीपेक्षा अधिक मैदानांवर शतके ठोकण्याची कामगिरी सचिन तेंडुलकरने केली आहे. तेंडुलकरने त्याची १०० शतके वेगवेगळ्या ५३ ठिकाणी ठोकली आहेत.

हे ही वाचा:

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

सुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

परदेशी मैदानांतही उत्तम कामगिरी

कोहलीने ज्या ज्या देशांत एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्या सर्व नऊ देशांत शतके केली आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये आठ देशांपैकी सात देशांत शतक ठोकले आहे. याला अपवाद आहे केवळ बांग्लादेश. त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध भारतात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारच्या खेळांत शतके ठोकली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा