वर्षभर जागवणार ‘हैदराबाद मुक्ती दिना’च्या स्मृती

केंद्र सरकारने दिली मंजुरी

वर्षभर जागवणार ‘हैदराबाद मुक्ती दिना’च्या स्मृती

भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी, हैदराबाद राज्याला निजामाच्या राजवटीपासून मुक्ती मिळाली होती. “हैदराबाद मुक्ती दिन” च्या स्मृतीप्रित्यर्थ १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

सांस्कृतिक मंत्रालय १७ सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद मुक्ती दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ज्यांनी हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी आणि भारतात विलीनीकरणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना श्रध्दांजली वाहणे हे या कार्यक्रमांमागचे उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशी जिहादी संघटनांची नजर झारखंडच्या मुलींवर?

मुसळधार पावसामुळे मुंबईत भाविकांची उडाली त्रेधा

भारताची अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर

बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’

 

भारतीय स्वातंत्र्यानंतर हा लढा अधिक तीव्र झाला. वंदे मातरमचा जयघोष करणार्‍या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्याच्या मागणीमुळे या लढ्याचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात झाले. ऑपरेशन पोलो अंतर्गत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्वरित केलेल्या कारवाईमुळे हैदराबाद मुक्ती शक्य झाली.

निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद राज्यात संपूर्ण तेलंगण, महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेश ज्यामध्ये औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि सध्याच्या कर्नाटकातील कलबुर्गी, बेल्लारी रायचूर, यादगीर, कोप्पल, विजयनगर आणि बिदर या जिल्ह्यांचा समावेश होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकार अधिकृतपणे १७ सप्टेंबर हा दिवस, मुक्ती दिन म्हणून पाळतात.

Exit mobile version