३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!

खटल्याची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी होणार

३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!

ज्ञानवापी परिसरातील व्यासजींच्या तळघरात जिल्हा न्यायालयाच्या निर्देशांनुसार, बुधवारी रात्री उशिरा पुजेला सुरुवात झाली. न्यायालयाने ३० वर्षांनंतर हिंदू पक्षाला येथे पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली. गुरुवारी येथे पहाटेची मंगल आरतीही झाली. पूजेच्या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती.

जिल्हा न्यायाधीश डॉ. अजयकृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी व्यास कुटुंब आणि काशी विश्वनाथ ट्रस्टच्या पुजाऱ्यांना तळघरातील मूर्तींची पूजा करण्याचे निर्देश दिले होते. खटल्याची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच बुधवारी रात्री उशिरा पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांची येथे बैठक झाली.

हे ही वाचा:

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक

त्यानंतर काशिनाथ विश्वनाथ मंदिरासमोरील रस्त्यातूनच व्यासजींच्या तळघरात जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. तेथील तळघरात मूर्ती ठेवून पूजा-अर्चा करण्यास सुरुवात झाली. विश्व हिंदू परिषदेनेही या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाने याचिकाकर्ता आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट यांना मिळून पुजारी नियुक्त करण्याचे निर्देश दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले.

डिसेंबर, १९९३पर्यंत या तळघरातील मूर्तींची पूजा होत असे. मात्र या दिवशी पुजारी व्यास यांना तेथे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर तेथे पूजाअर्जा तसेच भोग चढवणे बंद झाले. पुजारी व्यास येथे वंशपरंपरेनुसार येथे पूजा करतात. ब्रिटिशकाळातही ते येथे पूजा करत असत. मात्र डिसेंबर १९९३ मध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कोणतेही अधिकार नसताना तळघरातील ही पूजा रोखली होती, असा दावा याचिकाकर्ते व्यास कुटुंबीयांनी केला आहे. तर, तळघरात कधीच कोणत्याही मूर्ती नव्हत्या, तेथे कधीही व्यास कुटुंबापैकी कोणीही पूजा केली नाही, असा दावा अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने केला आहे.

Exit mobile version