‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!

वंदे भारत ट्रेनचा नवा रंग तिरंग्यातील आहे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!

देशभरात सेमी हायस्पीड ‘वंदे भारत ट्रेन’चे जाळे सर्वत्र पसरत आहे. सफेद-निळ्या रंगात बुलेट ट्रेनसारखी बांधणी असलेली ‘वंदे भारत ट्रेन’ लवकरच आता नव्या केशरी रंगात पाहायला मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईतील ‘वंदे भारत ट्रेन’ उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तिची पाहणी केली. या वेळी त्यांनी नव्या रंगातील ‘वंदे भारत ट्रेन’चा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, वंदे भारत ट्रेनचा नवा रंग तिरंग्यातील आहे. ते म्हणाले, वंदे भारत ट्रेनमध्ये २५ प्रकारच्या डेव्हलपमेंट करण्यात आल्या आहेत. आम्हाला या ट्रेन बद्दल जे फीडबॅक मिळत आहेत, त्यावरही आम्ही विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.

सध्या आरामदायक आणि गतीमान प्रवासासाठी वंदे भारतची मागणी वाढली आहे. वंदे भारतचे रुपडे ही बदलले आहे. केवळ रंगच नाही, तर प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहे. अनेक राज्यांकडून वंदे भारतची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली जात आहे. अनेक ठिकाणी ही ट्रेन सुरु पण झाली आहे. भाडे जास्त असल्याने प्रवाशी रोडावले होते. पण रेल्वे मंत्रालयाने भाडे कपातीची घोषणा केली आहे. त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

हे ही वाचा:

दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत

सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात आलेत!

नवीन वंदे भारत पुढील वर्षी ट्रॅकवर धावतील. वंदे भारतमध्ये केवळ रंगच बदलणार आहे, असे नाही. याशिवाय नवीन वंदे भारतमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत. नवीन वंदे भारतमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. दिव्यांगासाठी मोठी सुविधा देण्यात आल्या आहेत. तर प्रवाशांसाठी अनेक सुविधा मिळणार आहेत. नवीन वंदे भारतचे सीट आता मोठे असतील. तसेच ते ३६० डिग्रीमध्ये फिरवता येईल. त्याला आराम आसन व्यवस्था करता येईल. झोप आली तर प्रवाशांना सीट मागे घेऊन आराम करता येईल. सीट अजून आरामदायक आणि नरम करण्यात आले आहेत. त्यामुळे दूरच्या प्रवासात प्रवाशांना थकवा जाणवणार नाही.

मोबाईल चार्जिंग पॉईंट मिळेल. एक्झिक्युटिव्ह चेअरचा फुट रेस्ट एरिया वाढविण्यात आला आहे. तसेच स्वच्छता, चांगली प्रकाश योजना आणि इतर सुविधा मिळतील. तसेच दिव्यांगाना व्हीलचेअर घेऊन ते फिट करण्यासाठी फिक्सिंग पॉईंट्स मिळतील. वंदे भारत आता मुंबई-गोवा, बंगळुरु-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदुर आणि भोपाळ-जबलपूर या मार्गावर धावेल. ऑगस्ट २०२४ पर्यंत ७५ वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.

Exit mobile version