काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत

प्रकल्पाच्या कामाला वेग

काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत

देशातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगवान आणि सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेने वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. या गाड्यांना नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. देशात सध्या ३४ मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरु आहे. यातच आता काश्मीरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची तयारी भारतीय रेल्वेकडून केली जात आहे.

नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. त्यात आता उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला या मार्गावर वंदे भारत सुरू केली जाणार आहे. ही देशातील ४९ वी वंदे भारत ट्रेन ठरू शकते, असे सांगितले जात आहे. उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे अधिकारी विविध चाचण्या घेत आहेत. यातील काही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ही सेवा सुरु झाल्यानंतर जम्मू- श्रीनगर हे अंतर साडेतीन तासांत पार करणं शक्य होणार आहे.

हे ही वाचा:

संसदेतील घुसखोरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक

लोकल ट्रेनमध्ये तरुणीसोबत ठुमकने होमगार्डला पडले महागात!

पडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच…

उधमपूर – श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प हा २७२ किमी लांबीचा आहे. हा रेल्वे प्रकल्प उधमपूर ते बारामुल्ला असा सुरु होतो आणि काश्मीर खोऱ्याला USBRL अंतर्गत भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडतो. या प्रकल्पामध्ये ३८ बोगदे (एकत्रित लांबी ११९ किमी), सर्वात लांब बोगदा (T-49) १२.७५ किमी लांबीचा आहे आणि हा देशातील सर्वात लांब वाहतूक बोगदा आहे. ९२७ पूल (एकूण लांबी १३किमी) आहेत. या पुलांमध्ये चिनाब ब्रिजचा देखील समाविष्ट आहे, जो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.

Exit mobile version