नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

बुलेट ट्रेनच्या कामाला गती

नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई – अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावण्यासाठी सर्व आवश्यक त्या मंजुऱ्या केंद्राकडून राज्य सरकारने मिळवल्या आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला गती आली आहे. परंतु बुलेट ट्रेनच्या अगाेदर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही हायस्पीड गाडी धावण्याची शक्यता आहे. या गाडीची चाचणी सध्या घेण्यात येत आहे. नवरात्रीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस मुंबई – अहमदाबाद मार्गावर धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई – अहमदाबाद चाचणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या नव्या गाडीबद्दल मुंबईकरांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताशी १३० किलाेमीटर वेगाने मुंबई – अहमदाबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन अहमदाबादहून सुरतला अवघ्या २ तास ३२ मिनिटांत पोहोचते, तर शताब्दी एक्स्प्रेसला ३ तास लागतात. अहमदाबादहून सकाळी ७. ०६ वाजता निघाली आणि सकाळी ९.३८ वाजता सुरत स्थानकात पोहोचली . येथून रात्री १२.१६ वाजता मुंबई सेंट्रल न थांबता पोहोचली. अहमदाबाद ते मुंबई ४९२ किमी अंतर कापण्यासाठी ट्रेनला फक्त ५ तास १० मिनिटे लागतात, तर शताब्दी एक्स्प्रेसला अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी ६ तास २० मिनिटे लागतात.

हे ही वाचा:

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

देशात सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. आता तिसरी वंदे भारत ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. रेल्वेने हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसची नवीन २.० आ वृत्ती सुरू केली आहे. ही गाडी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही भारताची पहिली सेमी हाय स्पीड आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाइनमध्ये फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टम आहे, जे ९९% जंतू आणि विषाणू नष्ट करू शकते. वंदे भारत ट्रेनमध्ये विमानाची वैशिष्ट्ये आहेत. या ट्रेनमध्ये एसी, टीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे, हायक्लास पॅन्ट्री आणि वॉशरूम आहेत. वंदे भारत पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचे रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

Exit mobile version